पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र 2026

प्रकाशित:Published: Friday, September 18, 2026 🟢 अर्ज सुरू🟢 Open
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र 2026
🇮🇳 राज्यव्यापी रोजगार उपक्रम

पंडित दीनदयाळ उपाध्याय
रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र 2026

📍 बीड जिल्हा

📅 29 सप्टेंबर 2026
⏰ वेळ : सकाळी 10:00 ते सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत

18 ते 45 वयोगटातील युवक-युवतींसाठी विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा रोजगार मेळावा.

ℹ️ रोजगार महाकुंभाबाबत थोडक्यात

राज्यातील युवक-युवतींना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत 29 सप्टेंबर 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात येत आहेत.

या उपक्रमाचा प्रमुख उद्देश युवकांना त्यांच्या जिल्ह्यात अथवा परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योग व आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे तसेच नियोक्ते आणि रोजगार इच्छुक युवकांना एका सामायिक व्यासपीठावर आणणे हा आहे.

📌 बीड जिल्ह्यातील रोजगार महाकुंभ

📅 आयोजन दिनांक
29 सप्टेंबर 2026
⏰ आयोजनाची वेळ
सकाळी 10:00 ते सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत
📍 रोजगार मेळावा केंद्रे
बीड जिल्ह्यातील 16 प्रमुख ठिकाणे
👥 पात्र उमेदवार
महिला व पुरुष उमेदवार
🎂 वयोमर्यादा
18 ते 45 वर्षे
🎓 शैक्षणिक पात्रता
10 वी, 12 वी, ITI, Diploma, पदवी व पदव्युत्तर पात्रतेनुसार
💼 रोजगाराच्या संधी
सहभागी नियोक्त्यांकडून उपलब्ध पदांनुसार

🏢 रोजगार क्षेत्रे

बँक, पतसंस्था, मल्टिस्टेट संस्था, हॉस्पिटल्स, ऑटोमोबाईल्स, पेट्रोल पंप, साखर कारखाने, खासगी उद्योग, उत्पादन उद्योग, मॅन्युफॅक्चरिंग, फार्मा, हेल्थकेअर, शिक्षण संस्था, हॉस्पिटॅलिटी, हॉटेल्स, रिटेल, मॉल्स, सुपरमार्केट, लॉजिस्टिक्स, कुरिअर व डिलिव्हरी सेवा, वेअरहाऊस, ट्रान्सपोर्ट, फायनान्स व अकाउंटिंग, विमा, मायक्रोफायनान्स, ग्राहक सेवा, कार्यालयीन प्रशासन, डेटा एंट्री, बॅक ऑफिस, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम, सिक्युरिटी सेवा, सुविधा व्यवस्थापन, कृषी व कृषीपूरक उद्योग, विक्री व वितरण, सर्व्हिस सेक्टर तसेच इतर खासगी उद्योग व आस्थापना.

📍 बीड जिल्ह्यातील 16 रोजगार मेळावा स्थळे

  1. बंकट स्वामी महाविद्यालय, बीड
  2. के.एस.के. महाविद्यालय, बीड
  3. सावरकर महाविद्यालय, बीड
  4. जन शिक्षण संस्थान, बीड
  5. कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड, जि. बीड
  6. खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई
  7. शासकीय कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई
  8. वसंतदादा पाटील महाविद्यालय, पाटोदा
  9. कालिका देवी महाविद्यालय, शिरूर कासार
  10. आर. बी. अट्टल महाविद्यालय, गेवराई
  11. सिद्धेश्वर महाविद्यालय, माजलगाव
  12. जिजाऊ महाविद्यालय, धारूर
  13. ताराबाई महाविद्यालय, वडवणी
  14. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आष्टी
  15. लोकनेते गोपीनाथ मुंडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परळी वैजनाथ, जि. बीड
  16. महादजी शिंदे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, केज

📄 सोबत ठेवावयाची कागदपत्रे

  • शैक्षणिक कागदपत्रांच्या मूळ प्रती
  • शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बायोडाटा / Resume

📝 नोकरीइच्छुक उमेदवारांसाठी नोंदणी अर्ज
(Job Seeker Registration Form)

राज्यव्यापी रोजगार मेळावे / प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होण्यासाठी नोकरीइच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करावी.

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करावा.

📝 ऑनलाइन नोंदणी करा

📌 सहभागासाठी सूचना

ऑनलाइन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत संबंधित रोजगार मेळावा स्थळी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

💰 वेतन

वेतन संबंधित पद, शैक्षणिक पात्रता, अनुभव व सहभागी नियोक्त्याच्या नियमानुसार असेल.

💳 शुल्काबाबत महत्त्वाची सूचना
कोणतेही कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क अथवा सेवा शुल्क लागू नाही; ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
पूर्णपणे मोफत प्रक्रिया

⚠️ महत्त्वाची सूचना

रोजगार मेळाव्यात उपलब्ध पदे, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वेतन, नियुक्तीचे स्वरूप, सेवा अटी व इतर निकष सहभागी नियोक्त्यांनुसार असतील.

अंतिम निवड संबंधित नियोक्त्यांकडून त्यांच्या नियम व निवड प्रक्रियेनुसार केली जाईल.

📞 संपर्क व कार्यालयीन माहिती
बीड जॉब कन्सल्टन्सी
प्लेसमेंट, मनुष्यबळ पुरवठा आणि जाहिरात सेवा
(महाराष्ट्र शासनाच्या लागू कायदे व नियमांनुसार विधिवत नोंदणीकृत आस्थापना.)
🏠
कार्यालय / निवास
बीड, महाराष्ट्र – 431122
⏰
कार्यालयीन वेळ
सोमवार ते शनिवार
सकाळी 11:00 ते दुपारी 3:00
रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांना कार्यालय बंद.
📱
WhatsApp
फक्त WhatsApp संदेश
🎯 रोजगाराच्या संधीसाठी आजच नोंदणी करा!
ऑनलाइन नोंदणी करून आपल्या पात्रतेनुसार उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घ्या.