नियोक्ता नोंदणी Employer Registration
योग्य उमेदवार शोधा. मनुष्यबळ पुरवठा व भरती सेवांसाठी नोंदणी करा.
परिचय Introduction
बीड जॉब कन्सल्टन्सी, प्लेसमेंट, मनुष्यबळ पुरवठा आणि जाहिरात सेवा यांच्या माध्यमातून कर्मचारी भरती, मनुष्यबळ पुरवठा, जाहिरात सेवा तसेच इतर उपलब्ध सेवांचा लाभ घेण्यासाठी नियोक्ते, कंपन्या, उद्योग, आस्थापना, संस्था, व्यवसाय, कंत्राटदार, पुरवठादार (Vendor), सेवा प्रदाते तसेच विविध प्रकल्प आवश्यकतेनुसार नोंदणी करू शकतात.
नोंदणी प्रक्रिया Registration Process
संपर्क साधा
WhatsApp / ई-मेल
आवश्यक माहिती प्राप्त करा
लेखी स्वरूपात
नोंदणी फॉर्म पूर्ण करा
कागदपत्रांसह
प्राथमिक पडताळणी
माहिती व कागदपत्रे
पुढील प्रक्रिया सुरू
सेवा / भरती
आवश्यक माहिती Required Information
आवश्यकतेनुसार खालील माहिती किंवा कागदपत्रे मागविली जाऊ शकतात.
- कंपनी / संस्था / व्यवसायाचे नाव
- अधिकृत प्रतिनिधीचे नाव
- संपर्क क्रमांक व ई-मेल
- कार्यालयाचा पत्ता
- आवश्यक पदे व रिक्त जागा
- शैक्षणिक पात्रता किंवा आवश्यक कौशल्य
- कामाचे ठिकाण
- वेतन, मानधन किंवा इतर लागू लाभ (लागू असल्यास)
- आवश्यक मनुष्यबळ संख्या
- इतर संबंधित माहिती किंवा कागदपत्रे
शुल्काबाबत माहिती Fee Information
प्रत्येक सेवा, भरती, प्रकल्प किंवा आवश्यकतेनुसार कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क), सेवा शुल्क तसेच इतर लागू शुल्क वेगवेगळे असू शकतात. संबंधित माहिती सेवा सुरू करण्यापूर्वी लेखी स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल.
अधिकृत संवाद Official Communication
कन्सल्टन्सीकडून उपलब्ध करून दिली जाणारी सर्व माहिती, सूचना, नियम, अटी, प्रक्रिया, शुल्क, कागदपत्रे, संमती, पुष्टीकरण, करारनामा तसेच इतर सर्व अधिकृत संवाद शक्यतो लेखी स्वरूपात किंवा अधिकृत माध्यमांद्वारेच उपलब्ध करून दिले जातील.
कोणतीही महत्त्वाची माहिती, निर्णय किंवा आश्वासन केवळ दूरध्वनीवरील संभाषण, तोंडी चर्चा किंवा अनधिकृत माध्यमांच्या आधारे ग्राह्य धरले जाणार नाही.
नियोक्त्याची जबाबदारी Employer's Responsibility
नियोक्ता, कंत्राटदार, पुरवठादार (Vendor), सेवा प्रदाता किंवा संबंधित अधिकृत प्रतिनिधी यांनी अचूक माहिती, वैध कागदपत्रे आणि आवश्यक तपशील उपलब्ध करून द्यावेत. भरती, वेतन, सेवाशर्ती, कामाचे स्वरूप, कामाचे ठिकाण तसेच रोजगाराशी संबंधित सर्व बाबी लागू कायदे, नियम, अटी व धोरणानुसार असणे आवश्यक आहे.
महत्त्वाची सूचना
कन्सल्टन्सी संबंधित सेवेनुसार माहिती, नोंदणी, प्राथमिक पडताळणी, मार्गदर्शन, समन्वय, प्लेसमेंट सहाय्य, मनुष्यबळ पुरवठा आणि जाहिरात सेवा उपलब्ध करून देते.
अंतिम कर्मचारी निवड, नियुक्ती, रोजगार करार, वेतन, सेवाशर्ती तसेच रोजगाराशी संबंधित इतर सर्व निर्णय संबंधित नियोक्ता, कंपनी, उद्योग, आस्थापना, संस्था, व्यवसाय, कंत्राटदार, पुरवठादार (Vendor), सेवा प्रदाता किंवा संबंधित अधिकृत प्राधिकरणाच्या अधिकारक्षेत्रात राहतील.
या पेजमध्ये नमूद नसलेल्या इतर सर्व बाबी संबंधित कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज व कायदेशीर सेवा करारनाम्यानुसार तसेच लागू नियम, अटी व धोरणानुसार लागू राहतील.