🇮🇳 भारतीय असल्याचा अभिमान!

🇮🇳 आमची प्रेरणास्थाने

छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज
महात्मा ज्योतिराव फुले
महात्मा ज्योतिराव फुले
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

स्वराज्य, शिक्षण, समता, सामाजिक न्याय, स्वाभिमान आणि लोककल्याणाचा महान आदर्श निर्माण करणाऱ्या या महामानवांच्या विचारांना व कार्याला विनम्र अभिवादन आणि त्रिवार वंदन! 🙏

“ज्ञान, समता, न्याय, स्वाभिमान आणि मानवतेच्या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला या महामानवांकडून मिळते.”

श्री. मिलिंद आनंद गायकवाड — संस्थापक, बीड जॉब कन्सल्टन्सी
संस्थापक / मालक

श्री. मिलिंद आनंद गायकवाड

संस्थापक व मालक — बीड जॉब कन्सल्टन्सी, प्लेसमेंट, मनुष्यबळ पुरवठा आणि जाहिरात सेवा

  • १८ नोव्हेंबर २०१९ पासून कार्यरत
  • कार्य क्षेत्र : संपूर्ण महाराष्ट्र
  • निवास व कार्यसंपर्क : बीड व छत्रपती संभाजीनगर

शिक्षण, अध्यापन, तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांचा अनुभव असलेले उद्योजक. रोजगारविषयक माहिती, नियुक्ती सहाय्य, मनुष्यबळ पुरवठा आणि जाहिरात सेवा या क्षेत्रांत कार्यरत असून, आधुनिक डिजिटल माध्यमांचा वापर करून रोजगारविषयक माहिती उमेदवारांपर्यंत सुलभ, व्यवस्थित आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचविण्यावर भर आहे.

शैक्षणिक व व्यावसायिक पार्श्वभूमी

कला शाखेतील पदवी (बी.ए.), शारीरिक शिक्षणातील पदवी (बी.पी.एड.) आणि पदव्युत्तर पदवी (एम.पी.एड.) यांसोबत बांधकाम पर्यवेक्षण, पर्यटन व सेवा उद्योग, हॉटेल व्यवस्थापन तसेच संगणक व हार्डवेअर व्यवस्थापनातील व्यावसायिक डिप्लोमा व प्रशिक्षण घेतले आहे.

शारीरिक शिक्षण विषयातील पीएच.डी.चे संशोधन कार्य सध्या सुरू असून, शैक्षणिक क्षेत्रात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. संगीत क्षेत्रातील प्रशिक्षणासह विविध वाद्ये वाजविण्याचे कौशल्यही आहे.

व्यावसायिक अनुभव

वित्तीय सेवा व शाखा व्यवस्थापन, कार्यालयीन व प्रशासकीय कामकाज, अध्यापन व शारीरिक शिक्षण, बांधकाम पर्यवेक्षण तसेच समुपदेशन व मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांमध्ये कामाचा अनुभव आहे.

तांत्रिक व सर्जनशील कौशल्ये

संगणक व डिजिटल तंत्रज्ञान, ग्राफिक डिझाइन, डी.टी.पी., वेब डिझाइन व वेब विकास, मानव संसाधन व्यवस्थापन, संगणक व हार्डवेअर व्यवस्थापन, बांधकाम पर्यवेक्षण, फॅब्रिकेशन तसेच कार्यालयीन व प्रशासकीय कामकाजाचे ज्ञान व अनुभव आहे.

संस्थेचे कार्य

रोजगाराच्या संधी व भरतीविषयक माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचविणे, नियुक्ती सहाय्य, मनुष्यबळ पुरवठा तसेच जाहिरात व माहिती सेवा उपलब्ध करून देणे.

कार्यदृष्टी

रोजगाराच्या संधींबाबत केवळ माहिती उपलब्ध करून देणे नव्हे, तर उमेदवारांना योग्य माहिती समजून घेण्यास, योग्य संधी ओळखण्यास आणि आवश्यक मार्गदर्शन व सेवांपर्यंत पोहोचण्यास मदत करणे, ही आमची कार्यदृष्टी आहे.

संस्थेचे ध्येय

उमेदवारांना रोजगाराच्या संधींबाबत उपयुक्त, सुलभ आणि व्यवस्थित माहिती उपलब्ध करून देणे, योग्य संधी ओळखण्यास मदत करणे तसेच आवश्यक मार्गदर्शन व सेवांपर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्य करणे.

आमची मूल्ये

विश्वास पारदर्शकता अचूक माहिती जबाबदार सेवा

योग्य माहिती, योग्य मार्गदर्शन आणि विश्वासार्ह सेवा यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उमेदवारांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या रोजगाराच्या प्रवासात सकारात्मक योगदान देणे, हेच आमचे ध्येय आहे.

— श्री. मिलिंद आनंद गायकवाड, संस्थापक व मालक

संपर्क

मागे जा