अर्जदार नोंदणी Candidate Registration
खाजगी व कंत्राटी भरतीसाठी पात्र उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया.
परिचय Introduction
खाजगी व कंत्राटी भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी संबंधित प्रक्रियेनुसार अर्जदार नोंदणी करणे आवश्यक असू शकते. अर्जदार नोंदणी ही प्राथमिक प्रक्रिया असून ती अंतिम निवड, नियुक्ती किंवा रोजगाराची हमी मानली जाणार नाही.
नोंदणी प्रक्रिया Registration Process
जाहिरात वाचा
संबंधित भरतीची जाहिरात, पात्रता, प्रक्रिया, नियम व अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
WhatsApp वर संदेश पाठवा
नोंदणीसाठी अधिकृत WhatsApp क्रमांकावर संदेश पाठवावा.
अधिकृत माहिती प्राप्त करा
कन्सल्टन्सीकडून संबंधित भरती, प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क), सेवा शुल्क तसेच आगाऊ रक्कम किंवा सुरक्षा ठेव (लागू असल्यास) यांची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल.
संमती द्या
सर्व माहिती समजून व मान्य असल्यास लेखी संमती द्यावी. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.
विनंती अर्ज पूर्ण करा
प्राप्त विनंती अर्ज काळजीपूर्वक वाचून अचूक माहिती भरावी. आवश्यक असल्यास आई-वडील किंवा कायदेशीर पालकांची संमती घ्यावी.
अर्ज सादर करा
लागू असल्यास कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क) भरून त्याचा पुरावा जोडावा आणि विनंती अर्ज अधिकृत ई-मेलवर पाठवावा.
नोंदणीची पुष्टी
अर्जाची प्राथमिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नोंदणी स्वीकारल्यास नोंदणी क्रमांक (Registration Number) प्रदान केला जाईल.
आवश्यक कागदपत्रे प्राप्त करा
नोंदणीची पुष्टी झाल्यानंतर कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज, कायदेशीर सेवा करारनामा, नियम तसेच आवश्यक कागदपत्रे (लागू असल्यास) उपलब्ध करून दिली जातील.
पुढील प्रक्रिया
सर्व कागदपत्रे वाचून, समजून आणि आवश्यक कार्यवाही पूर्ण केल्यानंतर संबंधित भरती किंवा सेवा प्रक्रिया पुढे सुरू केली जाईल.
आवश्यक कागदपत्रे Required Documents
संबंधित भरतीनुसार पुढीलपैकी आवश्यक कागदपत्रे मागविली जाऊ शकतात.
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- ओळखपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- बायोडाटा / रिझ्युमे
- इतर आवश्यक कागदपत्रे
शुल्काबाबत माहिती Fee Information
प्रत्येक भरती, पद, सेवा किंवा प्रकल्पानुसार कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क), सेवा शुल्क तसेच आगाऊ रक्कम किंवा सुरक्षा ठेव (लागू असल्यास) वेगवेगळी असू शकते. संबंधित माहिती नोंदणीपूर्वी लेखी स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल.
सेवा शुल्क संबंधित सेवेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे संबंधित भरतीमध्ये उमेदवाराची निवड झाल्याची अधिकृत निवड सूचना (Selection Email), रोजगार प्रस्ताव पत्र (Offer Letter) किंवा त्यासमकक्ष अधिकृत लेखी पुष्टी प्राप्त झाल्यानंतर, लागू नियम, अटी, धोरण तसेच कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज व कायदेशीर सेवा करारनाम्यानुसार देय असेल.
अधिकृत संवाद Official Communication
कन्सल्टन्सीकडून उपलब्ध करून दिली जाणारी सर्व माहिती, सूचना, अटी, प्रक्रिया, शुल्क, कागदपत्रे, नोंदणी, संमती, पुष्टीकरण, करारनामा, नियम तसेच इतर अधिकृत संवाद शक्यतो लेखी स्वरूपात किंवा अधिकृत माध्यमांद्वारेच उपलब्ध करून दिले जातील. कोणतीही महत्त्वाची माहिती किंवा निर्णय केवळ दूरध्वनीवरील संभाषणाच्या आधारे ग्राह्य धरला जाणार नाही.
अर्जदाराची जबाबदारी Candidate Responsibility
अर्जदाराने अचूक माहिती सादर करावी, आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून द्यावीत आणि संबंधित सूचना, नियम, अटी व लागू धोरणांचे पालन करावे.
महत्त्वाची सूचना
अर्जदार नोंदणी म्हणजे अंतिम निवड, नियुक्ती किंवा रोजगाराची हमी नाही. अंतिम निवड, नियुक्ती व रोजगाराशी संबंधित सर्व निर्णय संबंधित नियोक्ता किंवा अधिकृत प्राधिकरणाच्या लागू नियम, अटी व धोरणानुसार निश्चित केले जातील.
या पेजमध्ये नमूद नसलेल्या इतर सर्व बाबी संबंधित कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज व कायदेशीर सेवा करारनाम्यानुसार तसेच लागू नियम, अटी व धोरणानुसार लागू राहतील.