अटी व शर्ती Terms & Conditions
वेबसाइट व सेवांचा वापर करण्याबाबत लागू असलेल्या अटी व शर्ती.
परिचय Introduction
या वेबसाइटचा, उपलब्ध सेवांचा किंवा नोंदणी प्रक्रियेचा वापर करणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्यावर या अटी व शर्ती लागू राहतील. वेबसाइट किंवा सेवांचा वापर केल्यास या अटी मान्य केल्याचे समजले जाईल.
सेवा Services
कन्सल्टन्सी संबंधित सेवेनुसार माहिती, नोंदणी, प्राथमिक पडताळणी, मार्गदर्शन, समन्वय, प्लेसमेंट सहाय्य, मनुष्यबळ पुरवठा, जाहिरात सेवा तसेच इतर उपलब्ध सेवा प्रदान करते.
नोंदणी Registration
संबंधित सेवेनुसार अर्जदार किंवा नियोक्त्याने अचूक, संपूर्ण व सत्य माहिती सादर करणे आवश्यक आहे. चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती आढळल्यास संबंधित प्रक्रिया स्थगित किंवा रद्द केली जाऊ शकते.
शुल्क Fees
प्रत्येक भरती, पद, सेवा किंवा प्रकल्पानुसार कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क), सेवा शुल्क तसेच आगाऊ रक्कम किंवा सुरक्षा ठेव (लागू असल्यास) वेगवेगळी असू शकते. संबंधित माहिती नोंदणीपूर्वी लेखी स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल.
सेवा शुल्क संबंधित सेवेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे संबंधित भरतीमध्ये उमेदवाराची निवड झाल्याची अधिकृत निवड सूचना (Selection Email), रोजगार प्रस्ताव पत्र (Offer Letter) किंवा त्यासमकक्ष अधिकृत लेखी पुष्टी प्राप्त झाल्यानंतर, लागू नियम, अटी, धोरण तसेच कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज व कायदेशीर सेवा करारनाम्यानुसार देय असेल.
अधिकृत संवाद Official Communication
कन्सल्टन्सीकडून उपलब्ध करून दिली जाणारी सर्व माहिती, सूचना, अटी, प्रक्रिया, शुल्क, कागदपत्रे, नोंदणी, संमती, पुष्टीकरण, करारनामा, नियम तसेच इतर अधिकृत संवाद शक्यतो लेखी स्वरूपात किंवा अधिकृत माध्यमांद्वारेच उपलब्ध करून दिले जातील. दूरध्वनीवरील किंवा तोंडी माहिती अंतिम अथवा अधिकृत मानली जाणार नाही.
भूमिका व मर्यादा Role & Limitations
कन्सल्टन्सीची भूमिका माहिती, नोंदणी, प्राथमिक पडताळणी, मार्गदर्शन, समन्वय, प्लेसमेंट सहाय्य, मनुष्यबळ पुरवठा आणि जाहिरात सेवा उपलब्ध करून देण्यापुरती मर्यादित आहे.
अंतिम निवड, नियुक्ती, पद, वेतन, सेवाशर्ती, कामाचे स्वरूप, कामाचे ठिकाण तसेच रोजगाराशी संबंधित इतर सर्व निर्णय संबंधित नियोक्ता, कंपनी, उद्योग, आस्थापना, संस्था, व्यवसाय, कंत्राटदार, प्रकल्प, सेवा प्रदाता किंवा संबंधित अधिकृत प्राधिकरणाच्या लागू नियम, अटी व धोरणानुसार निश्चित केले जातील. या बाबींमध्ये कन्सल्टन्सीचा कोणताही अंतिम निर्णय, अधिकार किंवा नियंत्रण राहणार नाही.
वापरकर्त्याची जबाबदारी User Responsibility
वापरकर्त्याने संबंधित जाहिरात, पात्रता, प्रक्रिया, नियम, अटी, शुल्क आणि सूचना काळजीपूर्वक वाचूनच पुढील प्रक्रिया करावी. आवश्यक कागदपत्रे, माहिती व संमती वेळेत उपलब्ध करून देणे ही संबंधित वापरकर्त्याची जबाबदारी राहील.
बदल Changes
कायदेशीर, प्रशासकीय किंवा सेवा आवश्यकतेनुसार या अटी व शर्ती वेळोवेळी सुधारित, बदलल्या किंवा अद्ययावत केल्या जाऊ शकतात. अद्ययावत आवृत्ती वेबसाइटवर प्रकाशित केल्यानंतर ती लागू होईल.
महत्त्वाची सूचना
कन्सल्टन्सीकडून उपलब्ध करून दिलेली कोणतीही सेवा अंतिम निवड, नियुक्ती किंवा रोजगाराची हमी मानली जाणार नाही. सर्व सेवा संबंधित नियम, अटी, लागू धोरण तसेच संबंधित नियोक्त्याच्या आवश्यकतांनुसार उपलब्ध करून दिल्या जातील.
या पेजमध्ये नमूद नसलेल्या इतर सर्व बाबी संबंधित कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज व कायदेशीर सेवा करारनाम्यानुसार तसेच लागू नियम, अटी, धोरण आणि त्या वेळी लागू असलेल्या भारतीय कायद्यांनुसार लागू राहतील.