Beed Job Consultancy

परतावा व रद्दीकरण धोरण Refund & Cancellation Policy

कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क व सेवा शुल्काबाबत परतावा आणि रद्दीकरण नियम.

प्रभावी दिनांक : 07 ऑगस्ट 2026  |  शेवटचे अद्यतन : 07 ऑगस्ट 2026

परिचय Introduction

हे परतावा व रद्दीकरण धोरण बीड जॉब कन्सल्टन्सी, प्लेसमेंट, मनुष्यबळ पुरवठा आणि जाहिरात सेवा यांच्या सर्व संबंधित सेवा, नोंदणी आणि व्यवहारांवर लागू राहील.

कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क) Consultancy Registration Fee (Process Fee)

कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क) एकदा भरल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. हे शुल्क नोंदणी, प्राथमिक पडताळणी, प्रशासकीय प्रक्रिया आणि संबंधित सेवांसाठी आकारले जाते.

सेवा शुल्क Service Fee

सेवा शुल्क संबंधित सेवेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे संबंधित भरतीमध्ये उमेदवाराची निवड झाल्याची अधिकृत निवड सूचना (Selection Email), रोजगार प्रस्ताव पत्र (Offer Letter) किंवा त्यासमकक्ष अधिकृत लेखी पुष्टी प्राप्त झाल्यानंतर, लागू नियम, अटी, धोरण तसेच कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज व कायदेशीर सेवा करारनाम्यानुसार देय असेल.

रद्दीकरण Cancellation

खालील परिस्थितीत संबंधित प्रक्रिया रद्द किंवा स्थगित केली जाऊ शकते.

  • चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती सादर केल्यास.
  • आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न केल्यास.
  • लागू नियम, अटी किंवा धोरणांचे पालन न केल्यास.
  • संबंधित नियोक्ता किंवा अधिकृत प्राधिकरणाच्या निर्णयानुसार.
  • अपरिहार्य प्रशासकीय, कायदेशीर किंवा तांत्रिक कारणांमुळे.

परतावा Refund

या पेजवर किंवा संबंधित सेवेमध्ये लेखी स्वरूपात स्पष्टपणे नमूद केलेल्या परिस्थिती वगळता कोणत्याही शुल्काचा परतावा देय राहणार नाही.

अधिकृत संवाद Official Communication

परतावा, रद्दीकरण किंवा संबंधित कोणतीही माहिती शक्यतो लेखी स्वरूपात किंवा अधिकृत माध्यमांद्वारेच उपलब्ध करून दिली जाईल. दूरध्वनीवरील किंवा तोंडी माहिती अंतिम अथवा अधिकृत मानली जाणार नाही.

महत्त्वाची सूचना

कोणतेही शुल्क भरण्यापूर्वी संबंधित सेवा, नियम, अटी, लागू धोरण, शुल्काची माहिती आणि आवश्यक प्रक्रिया काळजीपूर्वक वाचावी. शंका असल्यास प्रथम अधिकृत लेखी माध्यमातून माहिती घ्यावी.

या पेजमध्ये नमूद नसलेल्या इतर सर्व बाबी संबंधित कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज व कायदेशीर सेवा करारनाम्यानुसार तसेच लागू नियम, अटी, धोरण आणि त्या वेळी लागू असलेल्या भारतीय कायद्यांनुसार लागू राहतील.

संपर्क करा

परतावा किंवा रद्दीकरण संबंधित प्रश्न असल्यास संपर्क करा.