महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत कंपनी मार्फत कंत्राटी पद्धतीने विविध पदांची भरती

प्रकाशित:Published: Monday, August 17, 2026 🟢 अर्ज सुरू🟢 Open
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत कंपनी मार्फत कंत्राटी पद्धतीने विविध पदांची भरती
भरती २०२६

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) साठी कंपनीमार्फत (कंत्राटी पद्धतीने) विविध पदांची भरती – 2026

भरतीचा परिचय
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) साठी कंपनीमार्फत (कंत्राटी पद्धतीने) महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये विविध पदांसाठी पात्र महिला व पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

नोकरीचा प्रकार

ऑफ-रोल / कंत्राटी (कंपनीमार्फत)

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण महाराष्ट्र (विभागनिहाय).

नियुक्ती करताना अर्जदाराच्या राहत्या जिल्ह्यास अथवा जवळील कार्यक्षेत्रास प्राधान्य देण्याचा प्रथम प्रयत्न करण्यात येईल. तथापि, अंतिम नियुक्ती संबंधित कंपनीच्या आवश्यकता, उपलब्ध रिक्त पदे, नियम, अटी व लागू धोरणानुसार करण्यात येईल.

पात्र उमेदवार

  • महिला उमेदवार
  • पुरुष उमेदवार
शैक्षणिक पात्रता
  • 10 वी उत्तीर्ण
  • 12 वी उत्तीर्ण
  • आयटीआय
  • डिप्लोमा
  • कोणत्याही शाखेतील पदवी

(संबंधित पदानुसार लागू.)

अनुभव

अनुभवी तसेच विना अनुभवी महिला व पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

21+ ते 40+ वर्षे.

(कंपनीच्या नियम, अटी व लागू धोरणानुसार)

सेवा संधी

पात्र अर्जदारास वयाच्या 58 वर्षांपर्यंत सेवा करण्याची संधी उपलब्ध राहील.

(कंपनीच्या नियम, अटी व लागू धोरणानुसार.)

नियुक्तीचा प्रकार

प्रथम नियुक्ती कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने करण्यात येईल.

त्यानंतर अर्जदाराचे कामकाज, उपस्थिती, शिस्त, वर्तणूक, कार्यक्षमता, प्रामाणिकपणा व सेवा समाधानकारक असल्यास सेवेचे नूतनीकरण करण्यात येईल.

(कंपनीच्या नियम, अटी व लागू धोरणानुसार.)

पदनिहाय भरती

खालील पदांसाठी पात्र महिला व पुरुष उमेदवारांकडून अर्ज  मागविण्यात येत आहेत.

  • चालक (पुरुष)
  • वाहक (महिला / पुरुष)
  • यांत्रिक (महिला / पुरुष)
  • लिपिक (महिला / पुरुष)
  • सहाय्यक / हेल्पर (महिला / पुरुष)
  • स्वच्छता कर्मचारी (महिला / पुरुष)
पद क्र. १ — चालक (पुरुष)

शैक्षणिक पात्रता

  • 10 वी उत्तीर्ण
  • अवजड वाहन चालविण्याचा वैध परवाना

अनुभव

अनुभवी तसेच विना अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात.

मासिक वेतन

₹22,000 ते ₹35,000

(लागू भत्ते, लाभ, सुविधा व इतर सर्व बाबी कंपनीच्या नियम, अटी व लागू धोरणानुसार.)

विभागनिहाय रिक्त जागा

  • अमरावती विभाग
    (अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ)
    रिक्त जागा : 840
  • छत्रपती संभाजीनगर विभाग
    (छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड, जालना, लातूर)
    रिक्त जागा : 1,820
  • नागपूर विभाग
    (नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा)
    रिक्त जागा : 1,210
  • नाशिक विभाग
    (नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर)
    रिक्त जागा : 2,700
  • मुंबई विभाग
    (मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग)
    रिक्त जागा : 3,200
पद क्र. २ — वाहक (महिला / पुरुष)

शैक्षणिक पात्रता

  • 10 वी उत्तीर्ण
  • वैध वाहक बॅज (बिल्ला)

अनुभव

अनुभवी तसेच विना अनुभवी महिला व पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.

मासिक वेतन

₹18,000 ते ₹28,000

(लागू भत्ते, लाभ, सुविधा व इतर सर्व बाबी कंपनीच्या नियम, अटी व लागू धोरणानुसार.)

विभागनिहाय रिक्त जागा

  • छत्रपती संभाजीनगर विभाग
    (छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड, जालना, लातूर)
    रिक्त जागा : 200
  • नाशिक विभाग
    (नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर)
    रिक्त जागा : 230
पद क्र. ३ — यांत्रिक (महिला / पुरुष)

शैक्षणिक पात्रता

  • आयटीआय / डिप्लोमा (संबंधित शाखा)

अनुभव

अनुभवी तसेच विना अनुभवी महिला व पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.

मासिक वेतन

₹20,000 ते ₹32,000

(लागू भत्ते, लाभ, सुविधा व इतर सर्व बाबी कंपनीच्या नियम, अटी व लागू धोरणानुसार.)

रिक्त जागा

संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विभाग.

पद क्र. ४ — लिपिक (महिला / पुरुष)

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • मराठी व इंग्रजी टंकलेखन
  • संगणकाचे मूलभूत ज्ञान

अनुभव

अनुभवी तसेच विना अनुभवी महिला व पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.

मासिक वेतन

₹25,000 ते ₹38,000

(लागू भत्ते, लाभ, सुविधा व इतर सर्व बाबी कंपनीच्या नियम, अटी व लागू धोरणानुसार.)

विभागनिहाय रिक्त जागा

  • अमरावती विभाग
    (अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ)
    रिक्त जागा : 78
  • छत्रपती संभाजीनगर विभाग
    (छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, परभणी, नांदेड, जालना, लातूर)
    रिक्त जागा : 155
  • नागपूर विभाग
    (नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा)
    रिक्त जागा : 81
  • नाशिक विभाग
    (नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर)
    रिक्त जागा : 195
  • मुंबई विभाग
    (मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग)
    रिक्त जागा : 210
  • मुख्य कार्यालय (मुंबई)
    रिक्त जागा : 40
पद क्र. ५ — सहाय्यक / हेल्पर (महिला / पुरुष)

शैक्षणिक पात्रता

  • 10 वी उत्तीर्ण

अनुभव

अनुभवी तसेच विना अनुभवी महिला व पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.

मासिक वेतन

₹16,000 ते ₹24,000

(लागू भत्ते, लाभ, सुविधा व इतर सर्व बाबी कंपनीच्या नियम, अटी व लागू धोरणानुसार.)

रिक्त जागा

संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विभाग.

पद क्र. ६ — स्वच्छता कर्मचारी (महिला / पुरुष)

शैक्षणिक पात्रता

  • 10 वी उत्तीर्ण

अनुभव

अनुभवी तसेच विना अनुभवी महिला व पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.

मासिक वेतन

₹15,000 ते ₹22,000

(लागू भत्ते, लाभ, सुविधा व इतर सर्व बाबी कंपनीच्या नियम, अटी व लागू धोरणानुसार.)

रिक्त जागा

संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विभाग.

निवड प्रक्रिया
  1. कन्सल्टन्सीमार्फत ऑनलाइन अर्ज / नोंदणी.
  2. अर्ज व आवश्यक कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी.
  3. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी.
  4. मुलाखत.
  5. परीक्षा / कौशल्य चाचणी (संबंधित पदानुसार लागू असल्यास).
  6. अंतिम निवड.
  7. नियुक्ती.

टीप : संपूर्ण निवड प्रक्रिया संबंधित कंपनीच्या नियम, अटी व लागू धोरणानुसार राबविण्यात येईल.

महत्त्वाच्या तारखा

अद्ययावत (Updated) जाहिरात उपलब्ध

दि. 07 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 12:28 वाजता.

नोंदणी प्रक्रिया सुरू

दि. 09 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

दि. 15 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 03:00 वाजेपर्यंत.

प्रक्रिया कालावधी

भरती प्रक्रियेचा अंतिम कालावधी संबंधित कंपनीच्या नियुक्ती प्रक्रिया, आवश्यक प्रशासकीय कार्यवाही, नियम, अटी व लागू धोरणानुसार निश्चित करण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे
  • अद्ययावत बायोडाटा (Resume)
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • 10 वी गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  • 12 वी गुणपत्रिका व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • आयटीआय / डिप्लोमा / पदवी प्रमाणपत्र (संबंधित पदानुसार लागू असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
  • अवजड वाहन परवाना / वाहक बॅज / टंकलेखन प्रमाणपत्र (संबंधित पदानुसार लागू असल्यास)
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • नॉन-क्रीमी लेयर / ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट आकाराचे अलीकडील छायाचित्र
  • इतर आवश्यक कागदपत्रे (लागू असल्यास)

📌 महत्त्वाच्या सूचना📌 Important Notices

1

सदर भरती ही कोणत्याही प्रकारची शासकीय अथवा निमशासकीय नोकरी नसून, संबंधित कंपनी/आस्थापना/संस्था/नियोक्ता किंवा त्यांच्या अधिकृत बाह्य यंत्रणेमार्फत जाहिरातीत नमूद केलेल्या भरती प्रक्रियेनुसार राबविण्यात येत आहे.This recruitment is not any kind of government or semi-government job. It is being conducted by the concerned company/establishment/institution/employer or their authorized external agency as per the recruitment process mentioned in the advertisement.

2

सदर भरतीसाठी कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क) तसेच सेवाशुल्क लागू राहील. नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क) व सेवाशुल्क स्वतंत्र असून, सेवाशुल्क कायदेशीर सेवा करारानुसार देय राहील.Consultancy registration fee (process fee) as well as a service fee will be applicable for this recruitment. The registration fee (process fee) and service fee are separate, and the service fee will be payable as per the legal service agreement.

3

अर्जदाराची निवड, नियुक्ती, निश्चित/अंतिम वेतन, प्रशिक्षण, परिविक्षाधीन (Probation) कालावधी, सेवा अटी तसेच इतर सर्व बाबी संबंधित कंपनी/आस्थापना/संस्था/नियोक्ता यांच्या लागू नियम, अटी, धोरणे व अंतिम निर्णयानुसार राहतील.The applicant's selection, appointment, fixed/final salary, training, probation period, service conditions and all other matters will be as per the applicable rules, conditions, policies and final decision of the concerned company/establishment/institution/employer.

4

कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क) भरणे अथवा नोंदणी करणे याचा अर्जदाराच्या अंतिम निवडीशी कोणताही संबंध राहणार नाही. कन्सल्टन्सी नोंदणीची वैधता केवळ सदर भरती प्रक्रियेपुरतीच मर्यादित राहील. पुढील कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी स्वतंत्रपणे नवीन नोंदणी करणे आवश्यक राहील. भरलेले कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क) कोणत्याही परिस्थितीत परतावा (Refund) म्हणून दिले जाणार नाही.Paying the consultancy registration fee (process fee) or registering has no connection whatsoever with the applicant's final selection. The validity of consultancy registration is limited only to this recruitment process. A separate new registration will be required for any future recruitment process. The consultancy registration fee (process fee) paid will not be given as a refund under any circumstances.

5

अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरतीची संपूर्ण जाहिरात, पात्रता, वेतन, सेवा अटी तसेच इतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी. कोणतीही शंका अथवा अडचण असल्यास कन्सल्टन्सीच्या कार्यालयीन वेळेत केवळ WhatsApp संदेशाद्वारे संपर्क साधावा.Before applying, one should carefully read and understand the complete advertisement, eligibility, salary, service conditions and all other information related to the recruitment. For any doubts or difficulties, contact only via WhatsApp message during the consultancy's office hours.

6

जाहिरातीत नमूद केलेली माहिती, पात्रता, पदसंख्या, भरती प्रक्रिया, वेतन, सेवा अटी तसेच इतर बाबींमध्ये आवश्यकतेनुसार बदल, सुधारणा, स्थगिती अथवा रद्द करण्याचा अधिकार संबंधित कंपनी/आस्थापना/संस्था/नियोक्ता यांच्याकडे राखीव राहील.The right to make changes, amendments, suspend or cancel the information, eligibility, number of posts, recruitment process, salary, service conditions or other matters mentioned in the advertisement, as per necessity, is reserved with the concerned company/establishment/institution/employer.

7

बीड जॉब कन्सल्टन्सी ही केवळ खाजगी क्षेत्रातील भरती सेवा पुरविणारी संस्था आहे. शासकीय, निमशासकीय अथवा सरकारी भरतीसंदर्भातील कोणत्याही प्रकारची भरती सेवा कन्सल्टन्सीकडून पुरविली जात नाही. याची सर्व अर्जदार व वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.Beed Job Consultancy is an organisation that provides recruitment services only in the private sector. No recruitment service of any kind related to government, semi-government or official recruitment is provided by the consultancy. All applicants and readers are requested to kindly take note of this.

📌 अर्ज / नोंदणी करण्यापूर्वी कृपया खालील माहिती एकदा अवश्य वाचा.📌 Please read the information below carefully before applying / registering.