Beed Job Consultancy

खाजगी व कंत्राटी भरती

Private & Contract Recruitment

प्रभावी दिनांक : 07 ऑगस्ट 2026  |  शेवटचे अद्यतन : 07 ऑगस्ट 2026

परिचय Introduction

बीड जॉब कन्सल्टन्सी, प्लेसमेंट, मनुष्यबळ पुरवठा आणि जाहिरात सेवा यांच्या माध्यमातून विविध नियोक्ते, कंपन्या, उद्योग, आस्थापना, संस्था, व्यवसाय, कंत्राटदार व प्रकल्पांसाठी उपलब्ध खाजगी व कंत्राटी भरतीसंदर्भातील माहिती, नोंदणी, प्राथमिक मार्गदर्शन, समन्वय व प्लेसमेंट सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.

उपलब्ध भरतीचे प्रकार Available Recruitment Types

संबंधित नियोक्त्याच्या आवश्यकतेनुसार खालीलपैकी एक किंवा अधिक प्रकारची भरती उपलब्ध असू शकते.

ऑन-रोल
(On Roll)
ऑफ-रोल / कंत्राटी
कायमस्वरूपी
प्रकल्पाधारित
तासिका तत्त्वावर
तात्पुरती
निश्चित कालावधी
इतर लागू प्रकार

ऑफ-रोलमध्ये द्वितीय वेतनश्रेणी (Second Payroll), बाह्य यंत्रणेमार्फत (Outsourcing), तृतीय पक्ष वेतनश्रेणी (Third Party Payroll), कंत्राटी (Contractual) व कराराधारित (Agreement Based) यांचा समावेश होतो.

पात्रता Eligibility

शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्य, भाषा, संगणक ज्ञान, आवश्यक कागदपत्रे तसेच इतर अटी संबंधित भरती, पद, नियोक्ता किंवा प्रकल्पानुसार वेगवेगळ्या असू शकतात. संबंधित जाहिरात अंतिम ग्राह्य राहील.

शुल्काबाबत माहिती Fee Information

प्रत्येक भरती, पद, सेवा किंवा प्रकल्पानुसार कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क), सेवा शुल्क तसेच आगाऊ रक्कम किंवा सुरक्षा ठेव (लागू असल्यास) वेगवेगळी असू शकते. संबंधित माहिती नोंदणीपूर्वी लेखी स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल.

सेवा शुल्क संबंधित सेवेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे संबंधित भरतीमध्ये उमेदवाराची निवड झाल्याची अधिकृत निवड सूचना (Selection Email), रोजगार प्रस्ताव पत्र (Offer Letter) किंवा त्यासमकक्ष अधिकृत लेखी पुष्टी प्राप्त झाल्यानंतर, लागू नियम, अटी, धोरण तसेच कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज व कायदेशीर सेवा करारनाम्यानुसार देय असेल.

अधिकृत संवाद Official Communication

कन्सल्टन्सीकडून उपलब्ध करून दिली जाणारी सर्व माहिती, सूचना, अटी, प्रक्रिया, शुल्क, कागदपत्रे, नोंदणी, संमती, पुष्टीकरण, करारनामा, नियम तसेच इतर अधिकृत संवाद शक्यतो लेखी स्वरूपात किंवा अधिकृत माध्यमांद्वारेच उपलब्ध करून दिले जातील.

दूरध्वनीद्वारे किंवा तोंडी दिलेली माहिती अधिकृत अथवा अंतिम मानली जाणार नाही.

महत्त्वाची सूचना

अंतिम निवड, नियुक्ती, पद, पदनाम, रिक्त जागा, वेतन, मानधन, भत्ते, प्रोत्साहनपर लाभ, उद्दिष्टे, कामाशी संबंधित जबाबदाऱ्या, कामाचे स्वरूप, कामाची पद्धत, कामाचे ठिकाण, कार्यक्षेत्र, बदली, कामाचे तास, शिफ्ट, साप्ताहिक सुट्टी, रजा, प्रशिक्षण, परीविक्षाधीन कालावधी, कराराचा कालावधी, कंत्राट किंवा कराराचे नूतनीकरण, सेवेचा कालावधी, सेवेचे नूतनीकरण, सेवा सातत्य, सेवासमाप्ती, पदोन्नती, पदावनती, कामगिरीचे मूल्यमापन, उपलब्ध सुविधा तसेच रोजगार, सेवा किंवा नियुक्तीशी संबंधित इतर सर्व बाबी संबंधित नियोक्ता, कंपनी, उद्योग, आस्थापना, संस्था, व्यवसाय, कंत्राटदार, प्रकल्प, सेवा प्रदाता किंवा संबंधित अधिकृत प्राधिकरणाच्या लागू नियम, अटी, धोरणे व आवश्यकतांनुसार निश्चित केल्या जातील. या बाबींमध्ये कन्सल्टन्सीचा कोणताही अंतिम निर्णय, अधिकार किंवा नियंत्रण राहणार नाही.

कन्सल्टन्सीकडून उपलब्ध करून दिलेले मार्गदर्शन, नोंदणी, समन्वय किंवा इतर सेवा म्हणजे अंतिम निवड, नियुक्ती किंवा रोजगाराची हमी नाही.

या पेजमध्ये नमूद नसलेल्या इतर सर्व बाबी संबंधित कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज व कायदेशीर सेवा करारनाम्यानुसार तसेच लागू नियम, अटी व धोरणानुसार लागू राहतील.

नोंदणी करा आणि संधी मिळवा

योग्य नोकरीच्या दिशेने पहिले पाऊल टाका!